रानफुले-2

Submitted by स_सा on 5 July, 2010 - 12:10

रविवारी लोहगड किल्ल्यावर गेलो होतो.
हिरावाईचा रंग ओढलेले डोंगर दर्‍या. सगळं काही एकंदरीत मस्तच. खरेतर रानफुलांचा बहराच्या काळाला आजुन थोडा अवकाश आहे तरी काही फुलांनी त्यांचे रुप दाखवायला सुरवात केली आहेच.

त्यातली ही काही फुले मला समजलेली आणि न समजलेली.

सोनतारा Hypoxis aurea

Hypoxis aurea.jpgHypoxis aurea1.jpgगंगोत्रा Cyathocline purpurea

Cyathocline purpurea.jpgशेरल Persicaria glabra

Persicaria glabra.jpgPersicaria glabra1.jpgपांढरा सापकांदा Arisaema murrayi

Arisaema murrayi.jpgArisaema murrayi1.jpgशिंदळवान / रानहळद Curcuma pseudomontana

गौरी-गणपती मधे ही फुले बाजारात दिसतात

Lohgad107.jpgLohgad108.jpg

ह्या फुलांची आजिबात ओळख पटत नाहीये. तुमची मदत मिळाली तर बरे होईल

Lohgad082.jpgLohgad084.jpgLohgad198.jpg

रानफुलांमधे हे दोन फोटो नव्याने पोस्ट केले आहेत..

लाजाळू

एकदांडी / दगडी पाला

http://raanaphule.blogspot.com

गुलमोहर: 

मस्त! Happy

सचिन, आता संदर्भासाठी पुस्तक नाही हातात, नाहीतर नक्कीच खात्रीने नावे सांगितली असती.
आता अमरी दिसू लागतील. सापकांद्याचे पण बरेच प्रकार दिसतील आता.

प्रतिसादा बद्दल धन्यवाद मित्रांनो

दिनेशजी
खालच्या बाजुने दुसरा / तिसरा फोटो पिळुकी फुलाचा आहे का ??

लोहगडचे फोटोसुद्धा <<< लवकरच..

मस्त रानफुले! परवा तोरणा किल्ल्यावर जाताना ती 'रानहळदीची' फुले खुप दिसली ! तसे एक तरी झाड घरच्या बागेत असावे म्हणुन मी उपटण्याचा प्रयत्न केला.....पण व्यर्थ! Sad

म्हणुन मी उपटण्याचा प्रयत्न केला.....<<
अरे रे \
कृपया असे करू नका रे. रानातली फुले रानातच चांगली दिसतात.
चांगले दिसणारे एखादे फुल दुर्मिळ प्रजातिचे असु शकते, आणि फुले तोडल्याने त्या पासुन होणारा पुनरुत्पत्ती वर विपरित परीणाम होऊ शकतो हे तुम्ही समजू शकता.

लाजवाब फोटो.....दुसरा फोटो तर कौन बनेगा कऱोडपतीचा सेट वाटतोय........ साप कांदा तर खरा साप वाटतोय जणु तोंडातुन विषाचा थेंब टपकल्याचा भास होतो.......आणि अगदी बोलका फोटो म्हणजे शेवटचा ते फुल म्हणजे एक हात कंबरेवर आनि एक डोक्याजवळ ठेवुन ठुमका लावतंय अस वाटतंय